बीड जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरातांचं निलंबन

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत डॉ. थोरात यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, जिथे इतका मोठा भ्रष्टाचार झाला, तिथेच त्यांची पुन्हा बदली कशी झाली?

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितले की, डॉ. अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येणार असून, तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.

error: Content is protected !!