रामदास आठवले म्हणाले, ‘मी 20 फेब्रुवारीला ‘गो कोरोना गो’ची नारा दिला होता आणि देशभरातील कोरोनाचा प्रसार कमी झाला. कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. कोरोना पुढील 6-7 महिने राहिल. नंतर मात्र त्याला हद्दपार व्हावंच लागेल.’
कोरोना व्हायरस विरोधात ‘गो कोरोना गो’ असा नारा देऊन सोशल मीडियात अक्षरश: धुमाकूळ घालणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. कोरोना व्हॅक्सिनची सगळ्यांना प्रतिक्षा असताना रामदास आठवले यांनी दावा केला आहे की, COVID-19 व्हॅक्सिन पुढील एक-दो महिन्यात देशात उपलब्ध होईल.
हे वाचा : पाहा कुठल्या राज्यात काय नियम, नव्या Coronavirus मुळे Alert!
दरम्यान, रामदास आठवले हे आपल्या हटके वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहतात. देशभरात कोरोना विषाणूचं संक्रमण झाल्यानंतर ‘गो कोरोना गो’ असा मंत्र देऊन रामदास आठवले ते चर्चेत आले होते. सोशल मीडियावर ‘गो कोरोना गो’ हा त्यांचा नारा प्रचंड व्हायरल झाला होता.
‘गो कोरोना गो’चा नारा देणाऱ्या आठवलेंनाच कोरोना
रामदास आठवले यांनी गो कोरोना गो असा नारा दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आठवले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती देखीव ठणठणीत होती. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आठवले होम क्वारंटाईन झाले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. नंतर ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी कोरोनावर मात केली होती.