पोस्को प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने
प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकरला केले तडकाफडकी निलंबित

पोस्को प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने
प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकरला केले तडकाफडकी निलंबित

बीड दि.23 (प्रतिनिधी):
     केज तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे, जिल्हा परिषदेची बदनामी झाली. महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा, शर्ती, वर्तणूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी बेडकरला तडकाफडकी सेवेतून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी मंगळवार दिनांक 23 सत्तेवर रोजी देण्यात आले आहेत.
        केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 509/2025 नुसार केज पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी विभागाने प्रास्ताविक केल्याप्रमाणे तत्काळ मंगळवारी लक्ष्मण बेडसकरच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.


        दरम्यान लक्ष्मण बेडसकरला आष्टी येथे निलंबन कालावधीत देण्यात आले आहे.

error: Content is protected !!