बीड पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; कट्टा पुरवणारेही गजाआड


बीड दि. ९ (प्रतिनिधी):कंबरेला (Beed) गावठी कट्टा लावून सार्वजनिक ठिकाणी थांबलेला सागर उर्फ सनी प्रकाश मोरे (वय २४) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज शनिवार (दि. ९) रोजी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध बीड (Beed police) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बीड (Beed) शहरातील खासबाग लेडी रोडच्या उपविभागीय वन कार्यालयाच्या गेटसमोर एक इसम कंबरेला गावठी कट्टा लावून कोणाची तरी वाट पाहत थांबलेला माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सागर उर्फ सनी प्रकाश मोरे (वय २४ रा. खडीक्रशरच्या बाजूला, जुना धानोरा रोड, जिजाऊ नगर बीड) याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे ४० हजार रुपये किंमतीचे पिस्तुल मिळून आले. पोलिसांनी या पिस्तुल विषयी विचारले असता वैभव संजय वराट (रा. चक्रधर नगर बीड) व रितेश प्रभाकर वडमारे (रा. राजुरीवेस बीड) या दोघांनी दिल्याचे सनी मोरे याने सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी सागर उर्फ सनी गोरे, वैभव संजय वराट आणि रितेश प्रभाकर वडमारे या तिघांविरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात शनिवार (दि. ९) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरिल कारवाई (Beed police) पोलिस अधीक्षक नवनीत कांवंट, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, स्थगुशाचे पोनि. शिवाजी बेंटवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोउपनि श्रीराम भोसले, पो. ह. विकास राठोड, आनंद हळके, राहुल काळे, अंकुश वरणे, पोलिस अमलदार मनोज परजणे, जयशंकर सत्त्य, अर्जुन यादव यांनी केली आहे.

error: Content is protected !!