पवारांचे विश्वासू नेत्याने भाजपात प्रवेश

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण (Gulabrao Chavan) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपात (BJP) प्रवेश केला. हा कार्यक्रम खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या निवासस्थानी झाला. गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे खंदे समर्थक आहेत.

गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गमधील स्थानिक नेते आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मालवणमधील नारायण राणे यांच्या ‘नीलरत्न’ निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुलाबराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. नारायण राणे यांच्यासह पुत्र आणि आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड व भाजपचे काही स्थानिक नेते उपस्थित होते.

गुलाबराव चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामधले मोठे नाव आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आदर्श मानणारे गुलाबराव चव्हाण हे ३० वर्षांपेक्षा जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत संचालक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!