बीड बसस्थानकात वृद्ध महिलेवर हल्ला, कानातील सोने हिसकावल्याने कान तुटला


 
बीड बसस्थानकात रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या कानातील सोनं हिसकावण्याच्या प्रयत्नात त्यांचा कान चक्क तुटला, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

६० वर्षीय नागाबाई मंजुळे या महिला मेहकरहून लातूरला जाण्यासाठी बसने जात होत्या. त्या बसस्थानकात नैसर्गिक विधीसाठी उतरल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या कानातील सोन्याचे झुंबर जोरदार झटक्यात ओरबाडून नेले. या अचानक धक्क्यामुळे त्यांच्या कानाची पाळी फाटली आणि रक्तस्राव सुरू झाला. 

ही घटना झाल्यावर नागाबाई मंजुळे मानसिक तणावात गेल्या. प्रवाशांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, पण त्या हादरून गेल्या होत्या आणि उत्तर देऊ शकत नव्हत्या. 

बीड बसस्थानकावर चोरी, लुटमार आणि पाकीटमारीचे प्रमाण वाढत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन वृद्ध महिलांची सोनसाखळी लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

या घटनेमुळे चोरटे आणि पोलीस यांच्यात मिलीभगत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. 

error: Content is protected !!