केज येथे भीषण दुर्घटना: अपघातानंतर कंटेनरला जमावाने लावली आग; १५ जखमी, एकाचा दुर्दैवी मृत्यू



केजमध्ये भीषण अपघात: मद्यधुंद कंटेनर चालकाने गाड्यांना धडक दिली, जमावाचा संताप 

बीड जिल्ह्यातील केजमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास एका मोठ्या कंटेनरने ८ ते १० गाड्यांना धडक देत भीषण अपघात घडवला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. 

घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे, कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्या बेफिकीर वाहन चालवण्यामुळे हा गंभीर अपघात घडला. कंटेनरने लोखंडी सावरगावजवळ इतर गाड्यांना जोरदार धडक दिल्यानंतर तो पुढे पलटी झाला. 

अपघातानंतर जमावामध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. स्थानिकांनी संतप्त होऊन पलटी झालेल्या कंटेनरला आग लावली. घटनेनंतर पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचली. जखमींवर केज आणि अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या घटनेने वाहतूक सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंतेची भावना निर्माण केली असून, मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

error: Content is protected !!