ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त;

ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor): भारतीय सेनेचा ऐतिहासिक हल्ला

भारतीय सेनेनं अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वी केली. भारतीय हवाई दलानं ७ मेच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या तळांवर प्रिसिजन एअर स्ट्राईक करून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या महत्त्वपूर्ण मोहिमेचे ऑपरेशन सिंदूर असे नामकरण करण्यात आले.

भारतीय हवाई दलाचा निर्णायक हल्ला

भारतीय वायुदलाने जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या तळांवर जोरदार हवाई हल्ला करून त्यांचे ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त केले. मध्यरात्री दीडच्या सुमारास सुरू झालेल्या कारवाईत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केला नाही, हे विशेष लक्षात घेण्याजोगे आहे.

तीन शहरांमध्ये लक्ष्यभेद

भारतीय सेनेनं केवळ अतिरेक्यांचे तळ लक्ष्य करत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे अचूक हल्ले केले. या मोहिमेअंतर्गत बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा विध्वंस करण्यात आला.

संयुक्त सैन्य कारवाई

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिउत्तर म्हणून, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी समन्वय राखून पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवले. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने स्वतःच्या हद्दीत राहून हवाई हल्ला केल्याचा दावा केला असला, तरी हा हल्ला प्रत्यक्षात पाकिस्तानच्या सुमारे १०० किमी आत झाला.

पंतप्रधान मोदींची थेट देखरेख

ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः मॉनिटर केली. ९ लक्ष्य ठेवण्यात आली होती आणि ती सर्व यशस्वीपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

भारतीय सेनेच्या या धाडसी मोहिमेने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा हल्ला एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. 🚀🔥

error: Content is protected !!