संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंकजा मुंडेंना मस्साजोगमध्ये येण्यास मज्जाव का केला, याबाबत खुलासा केला आहे.
धनंजय देशमुख म्हणाले, “पंकजा मुंडे यांनी मला भेटण्यासाठी फोन केला होता. मात्र, या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. आरोपींच्या समर्थकांचे आमच्यावर नेहमी लक्ष असते, आणि त्यांची नजर अजूनही आमच्यावर आहे. जर पंकजा मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली असती, तर त्याला जबाबदार मला ठरवण्यात आले असते. यामुळे या प्रकरणाला जातीय रंग मिळण्यास वेळ लागला नसता.”
“ही परिस्थिती टाळण्यासाठीच मी पंकजा मुंडेंना गावात न येण्याचा सल्ला दिला,” असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.