Jalna : वाळू माफियांकडून सतत बेकायदेशीर वाळू उपसाचे प्रकरण गंभीर होत असून, महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला व धमकावण्याचे प्रकार समोर येत आहेत. नुकतीच, जालना जिल्ह्यातील परतूर येथे एका धक्कादायक घटनेत महिला तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.
महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या वाळू उपसा प्रकरणात कारवाई करताना तहसीलदारांसमोर जीविताचा मोठा धोका निर्माण होत आहे. दुधना नदीपात्रामध्ये वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर परतूर पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सध्या हे आरोपी फरार आहेत.
प्रतिभा गोरे यांनी या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात स्वतः फिर्याद नोंदवली आहे. महसूल विभागाच्या कार्याला उघडपणे विरोध करणाऱ्या वाळू माफियांमुळे महसूल अधिकाऱ्यांवर काम करताना मोठा ताण येत आहे. या घटनेने महसूल व पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत.
हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस सतर्क
या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. महसूल विभाग व पोलीस यांच्या समन्वयाने अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जाण्याची गरज आहे.
—
** शकतो.