सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभर खळबळ उडवली आहे. याच पार्श्वभूमीवर, बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भाजप पदाधिकारी सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे.

अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकार आणि गृहखात्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले, “हे काय चाललंय? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी यावर उत्तर द्यावे. हा मारहाण करणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का?” त्यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल न झाल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.
याशिवाय, अंजली दमानिया यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सतीश भोसले कारमध्ये बसून नोटांची बंडलं मोजताना आणि डॅशबोर्डवर फेकताना दिसत आहे. या व्हिडिओत 500 आणि 200 रुपयांच्या नोटांची बंडलं स्पष्टपणे दिसत आहेत. दमानिया यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत विचारले, “हाच तो सतीश भोसले? कोण आहे हा? एवढे पैसे कुठून आले? या माणसाला अटक करा.”
या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असून, अंजली दमानिया यांनी सरकारवर आणि संबंधित नेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.