HMPV व्हायरसमुळे पुणे अलर्ट मोडवर




HMPV या व्हायरसचे नागपूरमध्ये 2 संशयित रुग्णआढळले आहेत. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र अलर्ट मोडवर आला आहे. अशातच आता या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. त्यामुळे या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना महामारीने होरपळलेलं पुणेही HMPV या व्हायरसमुळे अलर्ट मोडवर आलं आहे. मात्र पुणेकरांनो, हा व्हायरस नवीन असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पुणे महानगरपालिका सक्षम असून सर्व तयारी देखील करण्यात आली आहे.

पुणे l नायडू हॉस्पिटलमध्ये 50 स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार

HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नायडू हॉस्पिटलमध्ये 50 स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच पुणे महापालिकेअंतर्गत असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच या विषाणूचा पुण्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही.

याशिवाय विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश अद्याप दिले गेलेले नाहीत. मात्र गरज लागल्यास तपासणीचे आदेश देण्यात येतील, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल, असे पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!