दमानिया यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वंजारी समाज आक्रमक झाला असून दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात बीड मधील वंजारी समाज आक्रमक झाला आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत दमानिया यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वंजारी समाज आक्रमक झाला आहे.

“वंजारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केले, शासनात भरती केले, मग हळूहळू त्यांना बीड कडे आणण्यात आले. हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार? इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्यच नाही. त्यांना पैसे दिले जातात,” असे विधान दमानिया यांनी केले होते.

या वक्तव्याने वंजारी समाज आक्रमक झाला असून दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्यात आला आहे. दमानिया यांच्या वादग्रस्त विधानांमुळे दोन समाजात वितुष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वंजारी समाज आग्रही आहे.

error: Content is protected !!