करुणा शर्मांना नोटीस, सुरेश धसांनी माफी मागावी-प्राजक्ता माळीचा

भाजप आमदार सुरेश धस यांनी  मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव घेतलं होतं. यापूर्वी करुणा शर्मा यांनी देखील काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी हिच्या नावाचा उल्लेख केला होता. सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केल्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळी हिने मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी सुरेश धस यांनी माफी मागावी, असं म्हटलंय.

प्राजक्ता माळीने सांगितलं की, करुणा शर्मा यांनी नोटीस पाठवली होती, त्यानंतर त्यांनी माझ्या विषयी कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र, सुरेश धस यांनी माझं आणि इतर अभिनेत्रींचं नाव घेतलं, त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने केली आहे.

error: Content is protected !!