ग्रामीण भागातील युवकांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराची संधी

बीड दि.5 (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील युवक व युतीसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 18 ते 30 वयोगटातील अकुशल व्यक्तींना या प्रशिक्षणामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र व महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या साह्याने ग्रामीण भागातील युवतींना व युवकांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’ ही अभिनव योजना सुरू केली आहे. उस्मानाबाद (धाराशिव), बीड व जालना जिल्ह्यातील 18 ते 30 वयोगटातील अकुशल व्यक्तींना मोफत निवासी प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल बनविणे व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून आर्थिक स्तर वाढविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
जनरल ड्युटी असिस्टंट आरोग्यसेवा प्रशिक्षण कालावधी साडेचार महिने असून तीन महिन्याचे क्लासरूम प्रशिक्षण व दीड महिन्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण होणार आहे योजनेअंतर्गत युवक वयुतींना विविध सुविधांचा लाभ मिळत आहे सदर प्रशिक्षण मोफत असून मोफत वस्तीगृहाची वस्तीगृहात राहण्याची व मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारत सरकार तर्फे कौशल्य प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी व माहिती करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला व विद्यार्थिनीला प्रशिक्षणाच्या कालावधीत साडेचार महिन्यासाठी दररोज क्लास रूम प्रशिक्षGदरम्यान स्वतंत्र टॅबलेट दिला देण्यात येणार आहे उदयगिरी लॉन्स असोसिएशन उदगीर तर्फे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेद्वारे ग्रामीण भागातील युतीसाठी व युवकासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी बीड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास नियंत्रणा कार्यालयातील जिल्हा कौशल्य समन्वयक यांच्या 99 75 52 58 67 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!