विवाहीत महिलेशी ठेवले अनैतिक संबंध, लग्नानंतर घडला भयंकर प्रकार

एका विवाहीत महिलेचे तिच्या ओळखीच्या एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या महिलेचा पती कामानिमित्त दुसऱ्या राज्यात असायचा याचाच फायदा घेत तो तिच्या घरी सतत जायचा. पतीला जेव्हा त्यांच्या संबंधाविषयी समजले त्याने तिच्यासोबतचे नाते तोडले.

त्यानंतर त्या दोघांना तर रानच मोकळे झाले. तो तासन तास तिच्या घरीच असायचा. त्यामुळे ते दोघे राहत असलेल्या परिसरात त्या दोघांबद्दल चर्चा होऊ लागली. त्यामुळे त्यांनी एकमेकांसोबत मंदिरात लग्न केले.

बिहारमधील पटना जिल्ह्यातील बाढ अनुमंडल गावातील ही घटना आहे. नीरज असे त्या तरुणाचे नाव असून त्याने साक्षीसोबत (नाव बदलले आहे) मंदिरात लग्न केले. साक्षीला वाटले की लग्न झाल्यानंतर आता आपल्या सुखी आयुष्याला सुरुवात होईल. मात्र जसे ते दोघे एकत्र राहू लागले त्यांच्यात सतत वाद होऊ लागले.

हे पण वाचा :-

साक्षी व नीरज तिच्या घरी राहायचे. मात्र साक्षीला लग्नानंतर नीरजच्या घरी जायचे होते. मात्र नीरज तिला घरी नेण्यास तयार नव्हता. त्यामुळे साक्षी व त्याच्यात सतत वाद व्हायचे. मंगळवारी रात्री साक्षीने पुन्हा एकदा सासरी जायचा विषय काढला. त्यावरून नीरज चिढला. त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर नीरजने साक्षीचा गळा दाबून तिची हत्या केली.

या प्रकरणी साक्षीच्या बहिणीने नीरजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नीरज हत्येच्या दिवसापासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

error: Content is protected !!