…म्हणून डोंबिवलीत आज 1 रुपया लीटर पेट्रोल

शिवसेनेचा उपक्रम सध्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे.

डोंबिवली : पेट्रोलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. वाढणाऱ्या या किमतींमुळे  सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल परवडेनासंच झालं आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये आजच्या घडीला 102 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने पेट्रोलची विक्री होत आहे. 

इंधनाचे अवाक्याबाहेर गेलेले दर पाहता आता सर्वच स्तरांतून त्याचा निषेध करण्यात येत असून, हे दर नियंत्रणात आणण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. याच दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने म्हणजेच 13 जून रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेदरम्यान डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर पेट्रोल अवघ्या एक रुपयात एक लीटर या प्रमाणानं विकलं जाणार आहे. 

error: Content is protected !!