75 वर्षीय नानीबाईंची कोरोनावर मात

अनेक आजार असतानाही मिळवला कोरोनावर विजय

(27 May) बीड शहरापासून जवळ असलेल्या पेंडगाव येथील ७५ वर्षाच्या नानीबाई सोपानराव जाधव यांनी रक्तदाब आणि इतर अजार असतानाही इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. येथील माऊली हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर डॉ, सबसे यांनी उपचार केले. त्यानंतर नवजीवन ग्णालयातही डॉ. भावले यांनी उपचार केले. १५ दिवस रुग्णालयातील उपचारानंतर नानीबाईंनी कोरोनावर मात केली. त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षाने दिसून आल्यामुळे त्यांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. मात्र ती निगेटिव्ह आली. त्यानंतरही पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

निमोनियाची त्यांना बाधा झाल्याचे ही निदर्शनास आले. १३ स्कोर आल्याने त्यांना डॉ. सवासे यांच्या माऊली हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांना प्राणवायूची गरज भासू लागल्याने आणि माऊलीमध्ये बेड शिल्लक नसल्याने नवजिवन रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या परिवारातीलच त्यांची नात डॉ. मोहीनी जाधव, डॉ. योगेश जाधव, डॉ. वर्षा जाधव, डॉ. मनोज लांडगे, डॉ. रोहिनी पड़ोळे यांनी त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवले. शेवटी पंधरा दिवसानंतर त्यांनी कोरोनाला हरवले.

त्यांच्या या धैर्याचे सौ. मंगल जाधव, सौ. दिपा जाधव यांच्यासह त्यांचे चिरंजीव अंबादास जाधव, रामदास जाधव आणि विनायक जाधव यांनी सर्वांचेच आभार मानले. या आजारपणामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील जाधव परिवाराला मोठा घिर दिला. ७५ वर्ष पार केल्यानंतर देखील नानीबाईंनी कोरोनावर मात करुन इच्छाशक्ती असल्यावर काय होवू शकते हे दाखवून दिले आहे.

error: Content is protected !!