कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’, नरेंद्र मोदींवर नवाब मलिकांचा निशाणा

मुंबई : देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ चा प्रचार करण्यात येत आहे. मात्र कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न आता केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.  (NCP Leader Nawab malik criticized PM Narendra Modi on ‘Benaras Model’)
बनारसच्या घाटावरील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी मृतदेह गंगा नदी टाकले. या घटनेची देशभर आणि जगभर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारस मॉडेल बनवण्यासाठी डीएम, डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र बनारस मॉडेल काही नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.(Nawab malik criticized PM Narendra Modi)
याचबरोबर, याठिकाणी कोरोना काळात ना टेस्टिंग होत होती. ना उपचार होत होते. औषधांचा काळाबाजार झाला. ऑक्सिजन काळ्याबाजाराने विकला गेला. ‘बनारस मॉडेल’ हे ‘निदान मॉडेल’ सारखे फेल गेले आहे. त्यामुळे बनारस मॉडेलचा प्रचार बंद करा, असेही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, काल (दि.२१) नवाब मलिक यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे, ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळत आहे. कधी ओबीसी तर कधी मराठा समाजाला भडकवणे हे राजकारण बंद करावे, असा स्पष्ट इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. 
याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे, तशी भूमिका केंद्राने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.  तसेच, देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे वकिलांना ‘चित भी मेरी और पट भी मेरी’ या पद्धतीने बोलता येते असा टोलाही नवाब मलिक( Nawab Malik )यांनी लगावला आहे. 

NCP leader Nawab Malik targets Narendra Modi on ‘Benaras Model’

error: Content is protected !!