पळून जाण्यासाठी कोरोनाबाधित महिलेने मारली आठव्या मजल्यावरून उडी

ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावर मारली उडी

कोरोनाबाधित महिलेचा महिलेने पळून जाण्याच्या उद्देशाने रूग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला आहे. दीप्ती सरोज काळे असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे यासह अनेक गुन्हयात तिला या महिन्याच्या सुरूवातीस पोलिसांनी अटक केली होती. यानंतर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या या महिला आरोपीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिचा आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने एका बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्हयात अडकविण्याची धमकी देऊन, ४६ गुंठे नावावर करून घेतले. त्यानंतर आणखी ५६ गुंठे द्यावी, अशी मागणी केली होती. एवढच नाही तर शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त देखील केले होते. यासह अनेक गुन्ह्यात मृत दीप्ती काळे आणि निलेश शेलार या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. दीप्ती काळे हिचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान तिच्यावर मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती. या सर्व घडामोडी घडत असताना. आज दुपारच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावर असलेल्या एक बाथरूममधून पाईपच्या मदतीने ती पळून जाण्यासाठी खाली उतरत होती. यावेळी तिचा तोल गेल्याने ती खाली पडली व तिचा मृत्यू झाला. या घटने प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

error: Content is protected !!