कोल्हापूर | कोरोना काळात कोल्हापूरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या लेखापरीक्षकांनी हा प्रकार उघडकीस आणत रुग्णालयाला खासगी दराप्रमाणे बिल आकारणी करायला भाग पाडलं आहे.
या कारवाईनंतर रुग्णाचं तब्बल दीड लाखांनी कमी झालं आहे. मागील दीड महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
रुग्ण वाढीचा वेग देखील जास्त असल्याने आता जिल्ह्यातील शासकीय रुग्णलयं हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे तीव्र आणि अतितीव्र लक्षणं असलेल्या रुग्णांना आता खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. याचाच फायदा घेत खासगी रुग्णालयांनी आता रुग्णांची जणू पिळवणूकच सुरु केली आहे.
दरम्यान, वारंवार याबाबतच्या तक्रारी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांच्या बिल तपासणीसाठी लेखापरीक्षक नियुक्त केले. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची कशी फसवणूक केली जाते याचे एक-एक उदाहरणच समोर येत आहेत.