केज आयसोलेशनमध्ये सुरू आहेत 170 रुग्णांवर उपचार
केज तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शारदा इंग्लिश स्कूल या ठिकाणी आयसोलेशन केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी एका 58 वर्षीय वयोवृद्धावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान सदरील वयोवृद्धाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना झाल्यानंतर तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी सदरील ठिकाणी जाऊन या बाबतची माहिती घेतली.
या आयसोलेशन विभागात 170 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केज, अंबाजोगाई या दोन्ही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात दररोज नवीन रुग्णांची भर पडू लागली आहे. केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूल या ठिकाणी आयसोलेशन केंद्र उभारण्यात आले. या ठिकाणी सुकळी येथील एका 58 वर्षीय वृद्धास दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत या ठिकाणी 170 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वृद्धाच्या मृत्युची बातमी महसूल विभागाला समजल्यानंतर घटनास्थळी तहसीलदार मेंढके, देशपांडे यांनी जावून याबाबतची अधिक माहिती घेतली.