बीड: 26-04-2020 जिल्हात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही आज पुन्हा १ हजार ८६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे . यात अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील बाधितांची संख्या अधिक आहे
काल जिल्हयातून सुमारे ३ हजार ५५७ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता आज सोमवार रोजी उशिरा सांयकाळी ५ वाजता अहवाल प्राप्त झाले असून या मध्ये २ हजार ४७१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर १ हजार ८६ जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत यात अंबाजोगाई २०३ ,आष्टी ९८, बीड २४६ ,धारूर ६२, गेवराई ९९, केज १०९, माजलगाव ४९, परळी १०६, पाटोदा ४१, शिरूर २१, आणि वडवणी तालुक्यात ५२ कोरोना बाधित आढळून आले आहेत .बीड आणि आंबाजोगाई तालुक्यात आजही बाधितांचा आकडा दोनशेच्या पार आहे