भाजपा नेत्या पंकजा मुंडे हळहळल्या; जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

खाजगी अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे खाजगी अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याचे समजताच त्या हळहळल्या. गोविंद मुंडेंच्या परिवाराला व्हिडीओ कॉल करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गेल्या काही दिवसांपासून त्याला या आजारातून बरे करण्यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या परंतु काळाने त्याला अखेर हिरावून नेले.

परळी जवळच्या कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले गोविंद मुंडे (40) हे पंकजा मुंडे यांचे 2009 पासून अंगरक्षक होते. मागील आठवड्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर परळीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना लातूर येथे हलविण्यात आले. गोविंदची तब्येत सुधारावी ते यातून सुखरूपपणे बाहेर यावेत यासाठी पंकजा मुंडे डॉक्टर, रूग्णालयातील यंत्रणा आणि त्याच्या कुटूंबियांशी बोलत होत्या, परंतु मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

गोविंद मुंडे यांच्या निधनाबद्दल पंकजाताई मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. ‘माझ्या परिवारातील एका तरूण, मेहनती व धाडसी सदस्य आपण गमावला आहे, त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

error: Content is protected !!