सलमान खान पडला या अभिनेत्रींच्या प्रेमात

आता कतरिनाची छोटी बहीण इसाबेल तिचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झालाय. इसाबेलचं एक व्हिडिओ गाणं ‘माशाअल्लाह’ नुकतंच रिलीज झालंय. हे गाणं रिलीज झाल्यावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाच्या सौंदर्याचे आणि तिच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. अभिनयासोबतंच चाहते तिच्या चुलबुल्या अंदाजावर देखील फिदा आहेत.

सोशल मिडियावर लोक कतरिनाची बहीण इसाबेलची खूप स्तुती करत आहेत. इतकंच नाही तर तिच्या सौंदर्याच्या प्रेमात अनेकजण वेडे झाले आहेत. यातलंच एक नाव म्हणजे बॉलीवूडचा दबंगमिया सलमान खान. सलमान खान इसाबेलचा दिवाना झाला आहे. सलमानने सोशल मिडियावर कतरिनाची बहीण इसाबेलचं गाणं पोस्ट केलंय. हा व्हिडिओ पोस्ट करत सलमानने म्हटलंय, ”अरे वाह इसाबेल, हे गाणं खुप छान आहे आणि तु देखील खुप सुंर दिसत आहेस. खूप सा-या शुभेच्छा.”

सलमानची ही कमेंट सगळ्यांचं लक्ष वेधुन घेत आहे. ‘माशाअल्लाह’ हे गाणं गायक डीप मनीने गायलंय. या गाण्यात इसाबेलचा हॉट अंदाज दिसून येतोय. २१ लाख पेक्षा जास्त लोकांनी आत्तपर्यंत युट्युबवर हे गाणं पाहिलं आहे. जेव्हापासून सलमानने हे गाणं शेअर केलं आहे तेव्हापासूनंच या गाण्याची जास्त चर्चा झालीये.

कतरिना कैफच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर कतरिनाला एकुण सात बहीणी आहेत. त्यापैकी तीन कतरिनापेक्षा मोठ्या आहेत आणि तीन तिच्यापेक्षा लहान आहेत. तिला एक मोठा भाऊ देखील आहे. इसाबेल कतरिनाची लहान बहीण आहे. तर सलमान खान त्याच्या आगामी ‘राधे’ या सिनेमात दिसून येणार आहे.

error: Content is protected !!