जालना/प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाछया नराधमास 10 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंड जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला आहे.
न्यायाधीश -1 सुनिल गंगाधरराव वेदपाठक यांनी 7 ऑगस्ट रोजी यांनी आरोपी शेख इसाक शेख मुसा रा. गलवे देवेगाव ता. पाथरी जि. जालना यास पिडीत मुलीवर बलात्कार करुन अत्याचार केल्याप्रकरणी 10 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला व दंड न भरल्यास 3 वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 4 जुन सायंकाळी फिर्यादीची मुलगी रोजासाठी जेवन तयार करुन घराबाहेर गेली, परंतु ती परत आली नाही. त्याची घराच्यांनी शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यासंदर्भात फिर्याद पिडीतेची आईने 5 जुन रोजी परतुर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन आरोपी शेख इसाक शेख मुसा याच्या विरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास करुन
प्रकरणात पिडीत मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पुैस लावून पळवून नेले व तिच्यावर परळी तालुक्यातील टोकवाडी येथे ओळखीच्या व्यक्तीच्या घरात
बलात्कार केला. यावरुन संबंधीत आरोपी शेख इसाक शेख मुसा याच्या विरुध्द भादंवि 363ख् 366-अ, 376 (आय) (जे) सह 3, 4, 5 (एल) (आर) (डब्ल्यू), 6 बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याप्रमाणे न्यायालयात दोषारोप दाखल केले. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पिडीत मुली, आणि तपासिक अंमलदार एन.वाय. अंतरप हे महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले व त्यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या प्रकरणात कोर्ट पैरवी कर्मचारी यांची मदत झाली. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फेें जयश्री बोराडे/सोळंके यांनी बाजु मांडली. त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीस 10 वर्षे कारावासाची व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
–