२८ ऑक्टोबरला कामावरुन घरी परतत असताना कमल शर्माची गोळया झाडून हत्या करण्यात आली. प्रेयसीच्या भावाची हत्या केल्या प्रकरणी एका प्रसिद्ध युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. कमल शर्मा असे मृताचे नाव असून तो निठारीचा रहिवाशी आहे.
कमल शर्माचा बहिणीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. निझामुल खान असे मुख्य आरोपीचे नाव आहे. बाइक स्टंटच्या व्हिडीओसाठी प्रसिद्ध असणाऱ्या निझामुल खान च्या यु-ट्यूब चॅनलचे नऊ लाख सबस्क्राइबर आहेत. निझामुलचे कमलच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. पण कमलचा या प्रेमसंबंधांना विरोध होता.
कमलने आपल्या बहिणीकडून तिचा मोबाइल हिसकावून घेतला होता व निझामुलला मारहाण केली होती. त्यानंतर युट्यूबरने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. निझामुलच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे