“जमिनीचे तुकडे घेऊन करायचं काय? काश्मीरमध्ये तिरंगा फडणार नसेल तर”- संजय राऊत

मुबई : काश्मीरमधील कलम ३७०चा प्रश्न निकाली लागला त्यानंतर आता इथं बिगर काश्मिरींना सरकारी आदेशानं जमिनी खरेदी करण्यास मुभाही मिळाली आहे. मात्र, अद्यापही श्रीनगरच्या चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यास बंदी आहे. त्यामुळे इथं जर तिरंगा फडणार नसेल तर जमिनीचे तुकडे घेऊन करायचं काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील आपल्या रोखठोक या सदरातून केला आहे.

राऊत म्हणाले, राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला तसाच काश्मीरची समस्याही कायमचीच संपायला हवी. आजवर भारतानं लढलेल्या चार युद्धांमध्ये जितका रक्तपात झाला नसेल तितका रक्तपात काश्मीरच्या भूमीवर झाला आहे. मोदी आणि शाह यांनी कलम ३७० उडवून लावले, ३५ अ कलमही संपवलं. पण अजूनही काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत झालेली नाही. उलट तिथल्या लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध आले. आजही काश्मीरमध्ये लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे.

error: Content is protected !!