मुंबई मधील या मॉलमध्ये भीषण आग

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलला रात्री 9 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलभर पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आली. आग विझवण्यासाठी गेल्या दहा तासांपासून अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सिटी सेंटर मॉलमध्ये जवळपास 200 हून अधिक दुकानं आहे. या सर्व दुकानांमध्ये मोबाईल अॅक्सेसरीजची दुकानं जास्त आहेत. त्यामुळे या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.

हे वाचा : भारत विषारी हवा सोडणारा देश, डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकास्त्र

मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉल (City Center Mall) मध्ये काल रात्री भीषण आग लागली. गेल्या दहातासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

काल रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही आग लागलेली होती. एका दुकानाला लागलेली आग आता संपूर्ण मॉलमध्ये पसरली आहे. मॉलच्या आजूबाजूच्या परिसरात आगीमुळे धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आलेली आहे. ब्रिगेड कॉल म्हणजेच, लेव्हल 4 च्याही पुढचा कॉल. याचाच अर्थ असा होतो की, मुंबईतील अग्निशमन दलाची सर्व केंद्र आहेत, तिथून मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे. आग विझवण्यासाठी तिथून यंत्रणा मागवण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलासोबतच काही खासगी यंत्रणांचीही मदत ही आग विझवण्यासाठी घेण्यात येत आहे.

दरम्यान, आगीची सध्याची स्थिती पाहिली तर, आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. 40 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.

error: Content is protected !!