मुंबई – अनलॉकचे 4 टप्पे उलटले तरीही डबेवाल्यांसाठी लोकलनं प्रवास करण्याची मुभा नव्हती.डबेवाल्यांनी अखेर कृष्णकुंजकडे धाव घेत आपली समस्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)यांच्याकडे मांडली.
हे वाचा : राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की
कोरोनाच्या काळात (corona)अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही लोकलनं प्रवास करण्याची परवानगी नव्हती. हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना अनलॉक 5 मध्ये अखेर डबेलवाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या डबेवाल्यानं लोकलनं प्रवास करण्याची परवानगी मिळाली असून त्यासाठी विशेष क्यू आर कोडही देण्यात येणार आहे. यामुळे नोकरदारांचा अन्नदाता असलेल्या डबेवाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. डबेवाल्यानं वारंवार हा प्रश्न मांडून देखील तो प्रलंबितच राहात होता.
24 सप्टेंबरला डबेवाल्यांच्या संघटनेनं राज ठाकरेंकडे आपले प्रश्न मांडली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा प्रश्न उचलून धरत ठाकरे सरकारकडे डबेवाल्यांचे प्रश्न सोडवण्याचे मागणी लावून धरली आणि अखेर न्याय मिळाला.
‘मुंबईतील (Mumbai) डबेवाले म्हणजे मुंबईतील नोकरदार वर्गाचे अन्नदातेच, जे रोज न चुकता गेली अनेक दशकं ह्या नोकरदारवर्गाला त्यांचा डबा पोहचवत होते. पण लॉकडाऊननंतरची अनेक ‘अनलॉक’ टप्पे आले पण ह्या डबेवाल्याना त्यांच्या हक्काच्या रेल्वेत प्रवेश द्यावा जे नोकरदार लोंबकळत प्रवास करत मुंबई गाठत आहे त्यांना घरचं जेवण मिळावं हे काही राज्य सरकारच्या ध्यानी आलं नाही.
शेवटी न्यायाच्या अपेक्षेने ह्या डबेवाल्यांनी श्री. राजसाहेबांची भेट घेतली होती आणि आपली व्यथा मांडली. राजसाहेबांनी योग्य पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देतो असं आश्वासन दिलं आणि आजच्या ‘अनलॉक’ च्या नियमावलीत डबेवाल्याना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली.’
अनलॉक 5 च्या टप्प्यात डबेवाल्यांना आता नोकरदार वर्गासाठी डबा पोहोचवता येणार आहे. लोकलनं प्रवास करण्याची परवानगी मिळाली असून आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पोस्टवरून यासंदर्भात माहिती देऊन आनंद व्यक्त केला आहे. कृष्णकुंजवर आलेल्या व्यक्तीला न्याय मिळतोच असं म्हणत ही पोस्ट मनसेनं केली आहे.