अधिकाऱ्यावर झाला गुन्हा दाखल,मुख्यमंत्र्यांना दिली खोटी माहिती

कोरोना (Corona) पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्यानं अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ (My Family) या सरकारी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व जनतेला आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आणि कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते. पण रवींद्र शिंदे (Ravindra Shinde) यांच्यावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात काम करत असता हलगर्जी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

हे वाचा : संजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट

राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने सर्वच यंत्रणेला कामाला लावले आहे. परंतु, कोरोनाच्या काळात खोटी माहिती दिल्यामुळे नाशिकमध्ये जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. अतिवरीष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

रवींद्र शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये (Video Confrencing) खोटी आकडेवारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राजपत्रीत वर्ग 1 च्या अधिकाऱ्याविरुद्ध,आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

error: Content is protected !!