Sanjay Raut Meeting with bjp leaders
मुबंई । रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांची भेट घेण्याअगोदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये होत असलेल्या भेटी आणि चर्चांमुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण उदयाला येणार का? अशा चर्चा यानंतर राजकीय वर्तुळात रंगल्या.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची आज (26 सप्टेंबर) दुपारी गुप्त भेट झाली. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाली. याअगोदर बरोबर आठवड्याभरापूर्वी (18 सप्टेंबर) भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. दानवे-राऊत भेटीनंतर आज फडणवीस-राऊत भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
रावसाहेब दानवे यांनी 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. “संजय राऊत यांची भेट घेण्यापाठीमागे कोणतंही राजकीय कारण नाही. महाराष्ट्रातल्या कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेतली”, असं दानवे यांनी सांगितलं होतं.