पैसे पाठवण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून भरावा लागणार कर

मुंबई, 21 सप्टेंबर : आपल्या घरातली व्यक्ती कोणी परदेशात असेल किंवा आपल्याला परदेशात पैसे पाठवयाला लागत असतील तर आता त्यावर वेगळा कर भरावा लागण्याची शक्यता आहे. कारण Tax Collected at Source (TCS) या संदर्भातील नियमावलीत बदल केला असून 1 ऑक्टोबर 2020 पासून हे नवे नियम लागू होणार आहेत. रकमेवर 5 टक्के टॅक्स आता भरावा लागेल.

रिझर्व्ह बँकेच्या Liberalised Remittance Scheme (LRS) अंतर्गत हा टॅक्स द्यावा लागेल. ज्यांची मुलं परदेशात शिकत आहेत अशा अनेक पालकांना मुलासाठी पैसै पाठवावे लागतात किंवा काही लोकांना त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करायची असेल तर त्यांना पैसे पाठवणं गरजेचं असतं.

नवीन नियमानुसार काय बदल झाले आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आधीच्या नियमांनुसार LRS अंतर्गत जर तुम्ही वर्षभरात 2.5 लाख डॉलरची रक्कम पाठवू शकत होतात त्यावर कोणताही कर लागत नव्हता. आता याच रकमेवर कर आकारणीसाठी TCS द्यावा लागणार आहे.

अशी मिळणार सवलत आणि हे आहेत नवीन नियम

जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी 7 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम वर्षभरात पाठवत असाल तर त्यावर तुम्हाला टॅक्स देण्‍याची गरज नाही. मात्र, 7 लाखांपेक्षा अधिक रकमेवर 0.5 टक्के कर लागणार आहे. टूर पॅकेजला मात्र या करातून वगळण्‍यात आलं आहे.

या नियमांबाबत केसीसी ग्रुपचे अध्‍यक्ष शरद कोहली म्हणाले, ‘ परदेशात विविध प्रकारच्या देयकांवर TDS लागू होतो. यासह वैद्यकीय उपचार, रुग्णालयांची बिलं, नातेवाईकांना करण्‍यात येणारी आर्थिक मदत या रकमा TDS अंतर्गत येत नव्हत्या. या सर्वांसाठी रिझर्व्ह बँकेच्या LRS अंतर्गत सूट मिळाली होती. मूळात कोणतीही भारतीय व्यक्ती परदेशात 2.5 लाख डॉलरची रक्कम विना टॅक्स पाठवू शकते. मात्र हीच रक्कम टॅक्स अंतर्गत आणण्‍यासाठी TCS घेण्‍याचा नवीन नियम लागू करण्‍यात आला आहे. यामध्येही काही गोष्‍टी वगळण्‍यात आल्या आहेत, मात्र अन्य सर्व बाबींवर 5 टक्के टॅक्स लागणार आहे.

TDS आणि TCS मधील हा आहे फरक

कोणती व्यक्ती परदेशात 100 रुपये पाठवते तेव्हा त्यावर 5 टक्के TDS लागू होतो त्यामुळे ज्याला पैसे मिळायचे आहेत त्याला 95 रुपयेच मिळतील. मात्र, TCS अंतर्गत समोरच्या व्यक्तिला पूर्ण 100 रुपये मिळतील पण पाठवणाऱ्या व्यक्तीकडून 100 रुपयांवर 5 टक्के म्हणजे पाच रुपयांचा TCS घेतला जाईल. वास्तविक ही रक्कम पाठवणाऱ्यांच्याच पॅनमध्‍ये क्रेडिट केली जाणार आहे. जी नंतर त्याला मिळेल. देशातील बहुतांश करदात्यांना TDS लागू आहे. आधीच जर अशा प्रकारचा TDS लागू असेल तर परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना TCS लागू होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!