कोरोनाचा (Corona) वाढता संसर्ग आणि त्यासोबत रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी मिळवण्यासाठी कुटुंबीय व नातेवाईक यांची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र प्रत्येक तालुक्यात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील युवकांनी व्हाट्सएप (Whatsapp), फेसबुक (Facebook) सारख्या समाज माध्यमातून एक होत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांचे सर्व स्तरातून (Contact the group ‘Ek Maratha, Lakh Maratha’ and beat Uncorona ‘)सर्वत्र कौतुक होत आहे.
हे वाचा : धक्कादायक: भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा ‘तिरंगा’ अन्…
समाज माध्यमातून जुन्नर (Junnar) तालुक्याच्या विविध गावातील युवकांनी एकत्र येत कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वतःला झोकून दिले आहे. सुमारे शंभर रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.
‘एक मराठा, लाख मराठा’ जुन्नर तालुका या ग्रुपच्या माध्यमातून शिवम घोलप, प्रवेश देवकर, अमित दुराफे, विक्रम आमले, शिनू गटकळ व त्यांच्या विविध गावच्या सहकाऱ्यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वतःला झोकून दिल्याने अनेक कोरोना बधितांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली आहे.