मुंबई: समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी बॉलिवूडची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केलाय. बॉलिवूडवर केल्या जाणाऱ्या आरोपांदरम्यान मंगळवारी शून्यकाळात जया बच्चन यांनी सरकारकडं हिंदी सिनेसृष्टीच्या मागं उभं राहण्याची विनंती केली.
‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ असं म्हणत भाजप खासदार रवि किशन यांचं नाव न घेता बच्चन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या वादात आता कंगना राणावत हिनं देखील उडी घेतली असून तिनं जया बच्चन यांच्यावर निशाणा साधात आणखी एक ट्विट केलं आहे.
हे वाचा :
‘हा’ निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा
बीड शहरात साडे आठ कोटीच्या विविध विकास कामांना लवकरच सुरूवात – नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर