पुणे : महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून बोलणार आहे असा सूचक इशारा देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपनं पलटवार केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी खरोखरच मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे. तरच त्यांना वस्तूस्थिती समजेल, असं सांगतानाच, ‘कंगना राणावतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला,’ असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला गेला असून त्याबद्दल योग्य वेळी बोलण्याचा इशारा देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न केला आहे.