भोपाळ | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी भाजपला जोरदार धक्का दिलाय. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या सतीश सिकरवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सतीश सिरकवार ग्वाल्हेरमधील मोठे नेते आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षात प्रवेश केल्यानं ते नाराज असल्याचं कळतंय.सतीश सिकरवार याच्यासोबत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
सिंधिया यांच्या भाजप प्रवेशामुळे सिकरवार नाराज झाले. सिंधियांना अधिक प्राधान्य दिलं जात असून त्यामुळे निष्ठावंतांकडे दुर्लक्ष झाल्याचं सिकरवाल यांनी म्हटलंय.