नवी दिल्लीः स्कॅम करणाऱ्या अटॅकर्स वेगवेगळे फंडे वापरत आहेत. सध्या ऑनलाइन डिलिवरी संबंधी स्कॅम जोरात सुरू आहे. ज्यात अनेक जण फसत असून त्यांचे बँक अकाउंट रिकामे केले जात आहेत. नवीन स्कॅममध्ये पीडित व्यक्तीला एक कॉल किंवा मेसेज येतो. तुमची ऑर्डर डिलिवरी पेंडिंग आहे. करोना व्हायरस मुळे ऑर्डर तुमच्यापर्यंत येवू शकत नाही, असे खोटे सांगितले जाते.
डिलिवरी कंपनी लॉकडाऊन नंतर पॅकेज पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसतो. परंतु, त्यानंतर अटॅकर पॅकेज पाठवण्याच्या नावाने पर्सनल डिटेल्स विचारून घेतो. तसेच पॅकेजच्या नावाने फारच क्षुल्लक रक्कम भरायला सांगितले जाते.
नवीन स्कीमचा धोकादायक भाग म्हणजे पर्सनल डिटेल्सची चोरी करणे नव्हे तर बँकिंग डिटेल्सची चोरी करणे हा होय. डिलिवरी फीसच्या ऑनलाइन पेमेंट साठी पीडित व्यक्ती लिंकवर क्लिक करताच त्यांच्या इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड्सची चोरी केली जाते. डिलिव्हरी फीस केवळ १० रुपये किंवा २० रुपये मागितली जाते. त्यामुळे कुणीही ही फी भरण्यास होकार देतो. छोटीसी रक्कमेची पेमेंट भारी पडू शकते. एकदा बँकिंग डिटेल्स चोरी झाल्यानंतर स्कॅमर सहजपणे बँक अकाउंट रिकामे करतो.
ऑनलाइन स्कॅम दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य नागरिकांना खोटी माहिती देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. तुमची पॅकेज डिलिवरी आली आहे. असे खोटे सांगून बँक अकाउंट रिकामे करण्याचे काम सध्या केले जात आहेत.
सावधान राहणे गरजेचे
कोणत्याही पॅकेजची डिलिवरी पेंडिंग असल्याचा मेसेज आला तर कन्फर्म करा की तुम्हाला एखादे पॅकेच येणार आहे की नाही. त्यानंतर तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांकडून पॅकेज पाठवल्याचे सांगितले तरी सुद्धा डिलिवरी साठी कोणतीही पेमेंट करू नका. कोणतीही डिलिवरी सर्विस पॅकेज डिलिवरी झाली नसली तर स्वःता पुन्हा प्रयत्न करत असते. पॅकेज डिलिवर झाली नाही तर ती पुन्हा ज्यांनी पाठवली आहे. त्यांच्याकडे पाठवले जाते. त्यामुळे अशा स्कॅमपासून अलर्ट राहणे गरजेचे आहे.