जगभारतल्या कोरोना रुग्णांनासाठी रशियाने आनंदाची बातमी दिलेलेली आहे. जगात कोरोनावर पहिली लस शोधल्याचा दावा रशियाने केला होता. आता लशीविषया मोठी माहिती समोर आली आहे.
येत्या आठवडाभरात रशियाने तयार केलेली कोरोनावरची Sputnik-Vही लस सर्व सामान्य नागरीकांसाठी उपलब्ध होणार आहे.
काही चाचण्या आणि आरोग्य मंत्रालयाच्या परवानगी नंतर या लशीची पहिली बॅच तयार होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. या लशीच्या व्यापक चाचण्या घेण्याची योजनाही रशियाने तयार केली आहे. रशियाच्या शास्त्रज्ञांनी संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने ही लस तयार केली आहे.
मात्र जगभरातून या लशीच्या चाचण्यांविषयी आक्षेप घेण्यात आले होते. मात्र आता रशियात सर्व सामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्याच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.