१०५ आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये जाऊन बसलेल्यांना माझी ताकद काय आहे हे विचारा…असं कडक शब्दांमध्ये संजय राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटद्वारे विरोधकांना हे खडे बोल सुनावले आहेत.
खासदार संजय राऊत आणि कंगणा राणावत यांच्यामध्ये घमासान सुरु आहे. या कारणामुळे सध्या संजय राऊत विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. नुकतंच भाजपाने हा सर्व प्रकार सुशांतच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला. यावरून संजय राऊत यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कंगणा रणावत आणि संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉर सुरु आहे. मुंबईत येऊन मराठी माणूस आणि मुंबई पोलिसांविरोधात अपशब्द खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका काही शिवसेना नेत्यांनी घेतली होती. तर मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं.