मुंबई, 2 सप्टेंबर: पुण्यातील कोरोनामुळे एका पत्रकाराला आपला जीव गमावला लागला आहे. टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचे पुण्याचे पत्रकार पांडुरंग रायकर (Pandurang Raykar) ( यांचं बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि आई-वडील असं कुटुंब आहे. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे पांडुरंग यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते नितेश (Nitesh Rane) राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हे वाचा : पुण्यात गॅस सिलेंडरचा स्फोट अख्ख घर झाल उद्ध्वस्त; १० जखमी
‘पुण्यात tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला? हे सत्य आहे. कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला!, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. कोरोना काळात निःस्वार्थी भावनेनी सेवा देणारे पत्रकार देखील सुरक्षित नाहीत! त्या COVID centre चे उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thakre) यांचा राजीनामा घ्या, हीच खरी श्रद्धांजली!’, अशा शब्दांत नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका करत थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांना ऑक्सिजन का मिळाला नाही याची तातडीने चौकशी करण्याचे आदेश राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत. तर पुण्यासह इतर जिल्ह्यांत अॅम्बुलन्स (Ambulance) तसंच ऑक्सीजन (Oxygen) कोणत्याही परिस्थतीत उपलब्ध करावे. वेळ पडल्यास भाडेत्त्वावर घ्यावे अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आणखी एका धक्कादायक प्रकारावर भाष्य केलं आहे. लक्षणविरहीत असताना श्रीमंत लोक दबाव वाढवत आय.सी.यूमध्ये भरती करतात याबाबत जिल्हाधिकारी यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे असं राजेश टोपे म्हणाले.
राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर आरोग्य प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. पत्रकार रायकर यांना आधी बेड मिळाला नाही आणि नंतर रुग्णवाहिका मिळाली नाही. यामुळे पत्रकार रायकर यांना आपला जीव गमवावा लागला. यावर आता सर्व स्तरातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.