राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी आज अखेरचा श्वास घेतला

महात्मा बसवेश्वरांच्या कार्याला अनूसरून सर्व जाती धर्मातील लोकांना आपल्या प्रवचनातून समानतेची शिकवण देणारे थोर संत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी सदैव अंधश्रद्धा निर्मूलन आणि वृक्ष लागवड तथा जल संवर्धनावर जनजागृती केली.
त्यांची शिकवण आपणा सर्वांना सदैव मार्गदर्शन करत राहील याची खात्री आहे.

राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!