पुणे | विवाहित तरुणाला समलैंगिक संबंध ठेवण्याचं लालच दाखवून त्याला मारहाण करत त्याच्याकडून पैसे लुबाडल्याचा प्रकार पुण्यात घडलाय. या प्रकरणी तरूणाने सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीचे एका गे अॅपवर रवी नावाच्या व्यक्तीबरोबर बोलणं झालं होतं. ते दोघे सकाळी साडे अकराच्या सुमारास सिंहगड रोडवरील एका ठिकाणी भेटले असता, अचानक तिथे तिघ-चौघ हातात तलवार, काठ्या घेऊन आले आणि फिर्यादीला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानी केलेल्या कृत्याचा व्हिडिओ काढत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करु, अशी धमकी देत फिर्यादीच्या बँक अकाऊंटवरील 84 हजार रुपये आणि त्याच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढुन घेतल्याचं कळतंय.
फिर्यादी विवाहीत असल्यामुळे हा प्रकार घरी कळल्यावर आपला संसार मोडेलं या भितीनी फिर्यादी पुर्णपणे घाबरुन गेला होता. हा सगळा प्रकार फिर्यादिने त्याच्या मित्राला सांगितला असता मित्राने त्याला धीर देत तक्रार नोंदवायला सांगितली. या सगळ्याची तक्रार सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली असता पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतं असल्याने कोणावर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे.