परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) | बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे व्यवसायाने डॉक्टर आहेत . त्यामुळे रुग्ण कोणताही असो त्यांच्यातली संवेदना जागृत असते . मुंबईहून शहरात येताच डॉ. प्रितम ताई गोपीनाथ मुंडेनी थेट कोविड रुग्णालय गाठले .खासदार असल्या तरी त्यांच्यातला डॉक्टर कायम जागाच असतो. याचाच प्रत्यय बुधवारी आला. डॉ. प्रितम मुंडे यांनी थेट विलगीकरण कक्ष गाठून कोरोनाग्रस्तांशी संवाध साधत त्यांना धीर दिला. मंगळवारी रॅपीड अँटेजीन टेस्टसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनाही खासदार आणि डॉक्टर असल्याने काळजी कशी घ्यावी हे सांगत घाबरु नका, असा दिलासा दिला.(Although an MP, Pritam Munde is a doctor; Interacted directly with the coronaries)
डॉ. प्रीतम ताईनी स्वःताची अॅन्टीजिन टेस्ट अगोदर करून घेतली निगेटिव्ह आल्यानंतरच कामाला सुरुवात केली हे विशेष . परळी शहरात आल्या बरोबर खासदारांनी अगोदर डॉ . बाबासाहेब आंबेडकर कोविड वस्तीग्रह सेंटर , लोकनेते स्व .गोपीनाथराव जी मुंडे नटराज रंग मंदिर आदी ठिकाणी भेटी दिल्या . विलगी करण कक्षात जावून रुग्णांच्या सोबत प्रत्येक्ष संवाद साधला . शहरात मोठया प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत . त्या संदर्भात डॉक्टरांच्या सोबत चर्चा केली . काही महत्वाच्या सुचना पण त्यांनी केल्या
प्रितम मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविड केअर सेंटर, लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदिर येथील तपासणी केंद्रालाही भेट दिली. काळजी घ्या, घाबरु नका, लवकर बरे व्हाल असा धीर देतांनाच त्यांनी डॉक्टरांशी देखील चर्चा केली. प्रितम मुंडे यांनी रुग्णांना दिलासा दिल्याने रुग्णांनाही हायसे वाटले.
दरम्यान, वैद्यकीय पदवीधर (एमबीबीएस) व सौंदयतज्ज्ञ (डर्मेटॉलॉजीस्ट) असलेल्या प्रितम मुंडे राजकारणात येऊन खासदार झालेल्या असल्या तरी अनेक वेळा त्यांच्यातील डॉक्टर त्यांना गप्प बसू देत नाही. मागच्या काळात घेतलेल्या आरोग्य शिबीरांतही केवळ आढावाच नाही तर त्यांनी स्वत: रुग्णांच्या तपासण्या करुन उपचार केले.
दरम्यान, बुधवारी पाच शहरांतील ५७५६ व्यापाऱ्यांच्या अँटेजीन टेस्ट चाचण्यांत २१० व्यापरी बाधीत आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २८९२ झाली आहे. आतापर्यंत ७१ मृत्यू झाले आहेत. तर, १४७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या आधीही अशी केली रुग्ण सेवा

प्रीतम मुंडे रस्त्याने जात असताना त्यांना एक अपघातग्रस्त महिला दिसली. यानंतर गाडी थांबवून मुंडे महिलेकडे धावत गेल्या आणि महिलेला पाणी दिले. यानंतर जखमी महिलेची विचारपूस करत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. यापूर्वीही ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी अशीच एका रुग्णाला मदत केली होती.
महाआरोग्य शिबिर चळवळ उभा केली होती. ज्यात सामान्य रुग्णांचा फार मोठा फायदा झाला .एवढेच नव्हे तर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ,खासदार प्रितम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून पाच वर्षात दीडशे कोटी रुपये पेक्षा अधिक विकास निधी आणला.ज्यामुळे रुग्णालयातील मूलभूत सुविधा मार्गी लागलेल्या आहेत. ज्याचा फायदा आज मानवी जीवाच्या संकटात रुग्णांचे जीव रक्षणासाठी होतो.