पुर्युषण काळात जैन मंदिरे उघडण्यास परवानगी देता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वीच स्पष्ट सांगितलंय. त्यामध्येच राज्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केलंय.
मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरु केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेस्या लोकांची रोजी-रोटी त्यावर अवलंबून आहे. तसेच त्यासोबत लोकांच्या भावनाही जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे याबाबत मी जरुर पाठपुरावा करेन, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.