ब्रेकिंगः एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

वर्ल्ड कप भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा जाहीर केला आहे.

आपल्या कारकीर्दीतील वेगवेगळ्या भागातील फोटो दाखविणारा व्हिडिओ धोनीने आपल्या इंस्टाग्राम वरती शेअर केलेला आहे ‘मैं पाल दो पल का शायर’ गाणे त्या व्हिडिओ च्या बॅकग्राऊंडला वाजत होते. त्यानंतर धोनीने धन्यवाद असे लिहिलेले आहे.

धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.

गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंग धोनीने आपल्या इंस्टाग्रामवर शनिवारी (१५ ऑगस्ट २०२०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि निवृत्तीची घोषणा केली आहे. 

आयपीएल खेळत राहणार

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!