पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांचा संकल्पनेतून जिल्हात दाट जंगल निर्मिती प्रकल्प

बीड: पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार(sp harsh podar) यांच्या संकल्पनेतून बीड पोलीस दलाच्या जिल्ह्यामधील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या स्वत:च्या जागांवर Dense Forest (दाट जंगल) निर्मीत्ती चा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उध्दघाटन मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांच्या हस्ते आज 74 व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वासनवाडी शिवारात करपरा नदीलगत असलेल्या बीड पोलिसांच्या 2 एकर 16 गुंठे क्षेत्रात वृक्ष लागवड करून करण्यात आले.

हे वाचा– बिंदुसरा धरण 98%भरले नदी पात्रातील नागरिकांनी सतर्क राहावे-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

Dense Forest (दाट जंगल) हा प्रकल्प बीड पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील एकुण 06 उपविभागामध्ये जेथे 5000 स्क्वेअर फुट किंवा त्यापेक्षा जास्त उपलब्ध असलेल्या पोलीस दलाच्या मालकीच्या जागेवर राबविण्यात येत आहे. यामध्ये बीड पोलीस दलाला मार्गदर्शनपर वन विभागाचे सहकार्य लाभले आहे. पर्यावरणाच्या संतूलनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याने बीड पोलीस पर्यावरण रक्षणासाठी व संतुलनासाठी स्वत:कडे उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून पर्यावरणाप्रति असलेले कर्तव्य निभावित आहे.या कोरोना विषाणूच्या महामारी मध्ये कोरोनाने आपल्याला शिकविले आहे, पर्यावरणाचा व निसर्गाचा आदर करा. त्यातूनच हा पर्यावरणाच्या शाश्वत विकासाचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा- उस्मानाबाद येथे विविध पदांच्या भरती २०२०.

आज दि.15 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील उपविभाग केज मधील केज शहर,आणि धारूर अशा 02 ठिकाणी मा.अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती स्वाती भोर यांच्या हस्ते उध्दघाटन करून Dense Forest (दाट जंगल) ची लागवड करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात बीड पोलीस दलाच्या मालकीच्या एकुण 08 वेगवेगळ्या ठिकाणी

हे वाचा- जिल्हा परिषद नांदेड येथे विविध पदांची भरती २०२०.

Dense Forest (दाट जंगल) ची लागवड करण्यात येत आहे. सदर Dense Forest (दाट जंगल) प्रकल्प राबविण्यात मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण बीड पोलीस योगदान देत आहे.

हे वाचा- बीड पोलिसांसाठी स्वतंत्र कोव्हिड विलगीकरण कक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!