अहमदनगर :ज्यांनी 5 वर्षे राज्याचं गृहखातं सांभाळलं त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही. हे दुर्दैवी आहे, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाजप अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही केला. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला झेंडा वंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे. 5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैव आहे.”