जिल्हा परिषद बीड शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम.
बीड (प्रतिनिधी) कोरोना आपत्तीमुळे मार्च महिण्यापासून सतत असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व गोष्टीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. पाच महिने शाळा बंद आहेत. शासन सर्व प्रकारे शिक्षणावर कार्य करत असतांनाच बीड जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षण विभाग च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्राथमिक शिक्षण अधिकारी अजय बहिर व उपशिक्षणाधिकारी प्रवीण काळम पाटील यांच्या पुढाकाराने एक अभिनव उपक्रम आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्ट 2020 या काळात बीड शहरातील तुलसी इंग्लिश स्कूलमधील सांस्कृतिक सभागृहात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन सकाळी 6.30 ते 7.30 जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकसाठी लाईव्ह योग शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबाराचा लाभ विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी घरी राहून याचा लाभ घेतला.
अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा पुढाकार महाराष्ट्रात बीड प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे.
योग शिबिरास योग प्रशिक्षक हेमंत बडवे, विकास गवते, सौ प्रविणा वाघमारे, सुहास पडोळे, अप्पासाहेब पवार यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये रोजच्या जीवनात सर्वांनी करावयाचे योगासनांचे सुलभ प्रकार, विविध प्राणायाम, कपालभाती क्रिया, ध्यान यांचा समावेश होता.
तसेच जिल्हा रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ सौ. सावित्री कचरे यांनी आहार मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या समारोपात योग शिक्षकाना प्रोत्साहन देण्यासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी नारायण नागरे, जिल्हा समन्वयक आसाराम काशीद यांनी
योग शिबीर समारोपाच्या निमित्ताने सर्वांचे आभार व्यक्त केले.
हा उपक्रम लाईव्ह सर्वांपर्यंत जावा यासाठी शेख अमजद व महेश भोपळे यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या.
योगाचा समावेश शालेय पातळी पासूनच व्हावा अशा प्रकारच्या सध्याच्या परिस्थितीत असलेला पालकांचा आग्रह बघता सर्व स्तरातून या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आणि कौतुक झाले.