मुंबई, 14 ऑगस्ट : ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नादाला लागूनच जगात Coronavirus चा प्रादुर्भाव वाढला आहे’, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. रशियात (Russian covid vaccine)कोरोनाची लस आली. त्याच्याही WHO विरोधात बोलली. पण तरीही पुतीन यांनी मुलीला लस टोचलीच, असंही राऊत म्हणाले.
हे वाचा- उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 4499 पदांकरिता ऑनलाईन अर्ज.
राऊत यांची WHO विरोधातली मल्लिनाथी चर्चेचा विषय ठरत आहे, कारण अगदी काही दिवसांपूर्वी सामनासाठी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतही राऊत यांनी WHO चा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता.
मुख्यमंत्र्यांना आरोग्याविषयी असलेल्या माहितीबद्दल कौतुक करत त्यांनी WHO लाही सल्ला घ्यावासा वाटेल असं ज्ञान असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. मुलाखतीचा हा भाग VIDEO meme म्हणूनही तेव्हा गाजला होता.
हे वाचा- मालेगाव येथे ४२७ पदांची भरती २०२०.
आता एबीपी माझावर दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी थेट WHO वर ताशेरे ओढले आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटनेत इथून तिथून गोळा केलेली मंडळी आहेत. त्यांच्यामुळेच जगभर कोरोना वाढत आहे’, असं राऊत म्हणाले.
करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर त्यामुळे त्यांना याचं श्रेय दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
सुशांत (Sushant singh Rajput) प्रकरणावराबद्दल बोलताना बिहारसाठी राजकारण केल्याचा आरोप राऊतांनी केला.
“त्यांच्यामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली. दीड दमडीच्या भाजपच्या बिहारमधल्या लोकांनी आमच्यावर शिंतोडे उडवले तक आम्ही किंमत देत नाही”, असं राऊत यांनी सांगितलं.
हे वाचा- दंतवैद्यक आणि पद्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच.